मानसिक त्रास देणाऱ्या प्रेयसीचा खून करून तिचे तुकडे करत फेकले !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मानसिक त्रास देणाऱ्या प्रेयसीचा खून करून तिचे तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी टाकणाऱ्या प्रियकरास खंडणी विरोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याने गळा आवळून खून केल्यावर तिचे मुंडके व हात-पाय कापून वेगवेगळे केले.

यानंतर हे तुकडे पोत्यात भरून लवासा घाट परिसरात ठिकठिकाणी टाकून दिले होते. राेझिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी(३१, रा.बुधवार पेठ) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर हनुमंत शिंदे( रा. बुधवार पेठ, पुणे) याला खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलिस नाईक राजेंद्र लांडगे यांना खबर मिळाली होती की रोझिना १० ते १२ दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्याबाबत फरासखाना पोलिस स्टेशन येथे मिसिंग दाखल अाहे. तिचे हनुमंत शिंदेसोबत अनैतिक संबध होते.

त्यानुसार हनुमंत शिंदेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, त्याने राेझिनाला सदनिका भाड्याने घेऊन दिली होती. तो तिच्याकडे अधूनमधून जात-येत असे. मात्र विवाह झाला असल्याने अापल्या घरी जात असे. ही बाब रोझिनाला खटकत होती, त्यामुळे घरी का जाताे, माझ्यासोबतच रहा असे बोलून शिवीगाळ करून सतत छळ करत होती.

तिने १२ ऑगस्ट रोजी असेच बोलून वाद घातला व शिवीगाळ केली. त्यामुळे रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सदनिका बंद करून अक्कलकोट येथे निघून गेला. १४ ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा चारचाकी छोटा टेम्पो घेऊन रोझिनाच्या सदनिकेवर गेलो.

तेथे धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले व ताडपत्रीच्या पिशवीत भरून भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळया ठिकाणी टाकून दिले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत शिंदेचा बुधवार पेठेतच मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. तेथेच तो कुटुंबासोबत रहात होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News