तो’ दहावी शिकला … अन डॉक्टर झाला! मात्र शेवटी चोरी पकडलीच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-सध्याच्या काळात कोण काय करेल किंवा कशाचा काळा बाजार करेल याचा काही भरोसा नाही.  कोरोनाच्या काळात औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असतानाच आता तर चक्क डॉक्टरही देखील बोगस असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

एकीकडे कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग आपला जीव धोक्यात टाकून काम करत असताना दुसरीकडे  बिजलीनगर येथील एका रुग्णालयातील  एका बोगस डॉक्टरवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

अक्षय केशव नेहरकर असे त्या  बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरकर याने कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले.

त्यानंतर वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे बायोडाटा पाठवला. त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ॲपियर अशी पदवी टाकून विविध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले.

तसेच मुलाखती दरम्यान डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगितले. पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखवता त्याने ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केली.

त्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात अक्षय नेहरकर याने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर ५ फेब्रुवारीला बायोडाटा पाठवला. त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही.

तसेच तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली.

त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला. त्यांनी आरोपीच्या पदवी बाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीचे विशाल काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली.अन हा प्रकार समोर आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe