अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे.
नुकतेच एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नगर मध्ये घडली आहे. नगर शहरातील एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील अनिल निवृत्ती बागूल या इसमाविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिडीत वृद्धेने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिडीताने फिर्यादीत म्हटले…अनिल बागूल हा माझ्या घरी आला.
दमदाटी करून त्याने मला जवळ ओढले व माझ्याशी गैरवर्तन करून मला सोप्यावर ढकलुन दिले. यानंतर बागूल याने पिडीतासह त्याच्या मुलाला व नातीला मारून टाकण्याची धमकी दिली.
पिडीत वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बागूल विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम