अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-आर्मीमध्ये नोकरीला असल्याचे भासवून चारचाकी वाहन विकण्याचा बहाना करत एका भामट्याने राहुरी येथील संतोष मोरे या तरूणाला सुमारे ५० हजार रूपयांना गंडा घातल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली असून काल राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अशोककुमार नामक व्यक्तीने तो आर्मीमध्ये नोकरीला आहे. असे भासवून त्याच्या फेसबुकवर वॅगनर कंपनीची चारचाकी गाडी विकण्यासाठी गाडीचे फोटो टाकले. दरम्यान राहुरी येथील संतोष सखाराम मोरे या तरूणाने फेसबुकवर सदर गाडीचे फोटो पाहून अशोककुमार या व्यक्तीला संपर्क केला.
गाडीचा सौदा करून गाडी घेण्याचे ठरले. त्यानंतर संतोष सखाराम मोरे या तरूणाने दिनांक ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान गुगल पे आणि पेटीएम द्वारे ४८ हजार रूपये पाठवले. मात्र पैसे दिल्यानंतर गाडी मिळत नाही. तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोष मोरे याने राहुरी पोलिसात धाव घेतली.
त्याच्या फिर्यादीवरून अशोककुमार नामक व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम