गाडीची चैन पडली म्हणून तो थांबला मात्र नंतर झाले असे काही….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- मोटरसायकलची चैन पडल्याने ती बसवण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबलेल्या एका मोटारसायकलस्वाराच्या गळ्याला सत्तुर लावत जिवे मारण्याची धमकी देत त्याच्या जवळील १० हजार रुपयांची रोकड व मोबाईल असा ऐवज अज्ञात तीन चोरट्यांनी घेऊन पोबारा केला.

ही घटना नगर- मनमाड महामार्गावर राहुरी जवळ रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अशोक भाऊसाहेब गायकवाड (रा.एकलहरा, बेलापूर, ता.श्रीरामपूर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गायकवाड हे मजुरी काम करत असून राहुरीवरुन ते गावाकडे मोटारसायकलवर निघाले होते. राहुरीच्या पुढे गेल्यावर सिमेन स्टेशन समोर आले असता त्यांच्या मोटारसायकलची चेन पडली. त्यामुळे ती बसविण्यासाठी ते रस्त्याच्या कडेला उभे होते.

त्यावेळी विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवर आलेल्या तिघा भामट्यांनी त्यांच्या गळ्याला सत्तुर लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील १० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने काढून घेतला आणि नगरच्या दिशेने भरधाव वेगात ते निघून गेले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe