अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- लग्न हे तसे प्रत्येकाच्याच जीवनातील एक अविस्मरणीय व अविभाज्य असा भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपले लग्न हे अविस्मरणी असावे, असेच वाटत असते.
मात्र ते प्रत्येकालाच जमते असे नाही. मात्र तरीदेखील प्रत्येकजण आपले किंवा आपल्या मुला मुलीचे लग्न इतरांपेक्षा जास्तीत जास्त वेगळे करण्याचा प्रयत्न करतात.
असाचा काहीसा अनोखा विवाह सोहळा तामिळनाडूत पार पडला. कारण हा विवाह सोहळा मंडपात नव्हे तर चक्क विमानात पार पडला.
सध्या सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे अनेक गोष्टींवर सरकारने बंधने घातलेली आहेत. त्यात लग्नासाठी तर केवळ ५० जणांनाच सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे.
परंतु लग्न हा सोहळा जीवनात एकदाच होत असल्याने प्रत्येकाला आपले लग्न हे अविस्मरणीय असावे असे वाटते. त्यासाठी मग अनेकजण शाही विवाह सोहळा आयोजित करतात.
पण सध्याच्या काळात ते खूप कठीण आहे. त्यामुळे अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडत आहेत.
पण तामिळनाडूत एका लाकूड व्यवसायिकाने त्याच्या मुलाचे अनोख्या पध्दतीने मात्र शाही विवाह पार पडला. कारण हा लग्न समारंभ थेट हवेत विमानातच पार पडल्यामुळे हे लग्न सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम