अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- लग्न करायचे तर माझ्याशीच करायचे. असे म्हणत तरुणाने त्याच्या प्रेयसिला साद घातली. आपले वय पुर्ण झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करुन आपण एक होऊ असे म्हणत त्याने तिची समजूत घातली.
यावेळी त्याने तिला भेटण्यासाठी साद देखील घातली होती. मात्र, दुर्दैवाने ती त्याला भेटण्यासाठी गेली नाही. उलट, मीच आता आत्महत्या करीत आहे. असे म्हणत तिने या तरुणाच्या मोबाईलवर एका विहीरीचे चित्र टाकले. आता आपली प्रेयसी आत्महत्या करते आहे.
असे समजताच व्हाटसअॅपवर आलेले फोटो पाहून याने क्षणाचाही विलंब केला नाही. या तरुणाने गळफास घेऊन आपली जिवणयात्रा संपविली. अचानक असे काय झाले? हे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु, मृत्युनंतर जेव्हा या तरुणाचा मोबाईल तपासला असता त्यातून हा सर्व प्रकार उघड झाला.
याप्रकरणी तुर्तास अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील कळस परिसरात राहणारा एक तरुण हा त्याच्या मामाच्या गावी गेला होता. यावेळी त्याची ओळख संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात राहणार्या एका तरुणीशी झाली होती.
या दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली तर नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा या तरुणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला प्रतिसाद देण्यास टाळाटाळ केली. उलट, तिने त्याला फसवत धमकविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो तिच्याशी व्हाटसअॅपवर बोलत होता तेव्हा तीने त्याला काही फोटो टाकले.
ते फोटाच खर्या अर्थाने या तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडून गेले. जेव्हा हा तरुण तिच्याशी संवाद साधत होता तेव्हा या तरुणीने त्याला एका विहीरीचे फोटो टाकले होते. आता मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे, मला संपर्क करु नको. असे म्हणत त्यांच्यात व्हाटसअॅपवर काही संभाषण झाले.
या तरुणाने आपल्या प्रेयसिचे फोटो पाहिले आणि तो प्रचंड अस्वस्थ झाला. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच राहिली नाही तर आपण का रहायचे? अशाच काहीसा प्रश्न त्याला पडला आणि त्याने काही वेळानंतर आपली जिवणयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी सकाळी त्याची आई कामासाठी घराबाहेर पडली होती.
दिवसभर हा प्रकार घडला असता जेव्हा ती सायंकाळी घरी आली. तेव्हा या तरुणाचा मृतदेह घरात लटकताना दिसला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. या तरुणाला वडिल नाही. आईने मोठ्या कष्टाने यास उभे केले होते. मात्र, दुर्दैवाने प्रेमाच्या भानगडीत पडल्याने एका चांगल्या तरुणाने आपला देह देवाच्या स्वाधिन केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम