शाळा सुरु करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे सगळ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे.

त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान अशातच आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यातील शाळा, महाविद्यालय कधी उघडणार याबाबत निर्णय येत्या चार-पाच दिवसांमध्ये घेतला जाईल.

शिक्षण विभाग टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल. येत्या पुढील काही दिवसात राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या हाचलाची चालू होती.

त्यामुळे आता शाळा उघडण्याची अजून प्रतिक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी लसीकरणात येणाऱ्या अडचणींना केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News