आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- ज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रचंड प्रमाणात थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

तसेच राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. दरम्यान, ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यामुळे

कुठेही ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन मर्यादित असल्यामुळे तो वाया जाणार नाही, याचीदेखील खबरदारी घेतली गेली, असं टोपेंनी सांगितलं आहे.

नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना हा अपघात होता. मात्र त्या घटनेत गेलेले बळी हे ऑक्सिजनअभावी गेलेले बळी असं म्हणणं चुकीचं होईल, असं टोपे म्हणादेखले. तो एक अपघात होता आणि असे अपघात इतरत्र होऊ नयेत,

याची खबरदारी घेण्यात आली होती, असं टोपे म्हणाले. राज्यात ऑक्सिजनचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करणारी यंत्रणा यांच्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.

ऑक्सिजन लावलेला एखादा रुग्ण स्वच्छतागृहात जात असेल तरी तेवढ्या वेळेपुरताही ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जात होता, असं सांगत काटकसर केल्यामुळेच ऑक्सिजन सर्वांना पुरवता आल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्य सरकारनं प्रतिदिन 16 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध केला आणि यापुढेही ऑक्सिजनचा तुटवडा पडेल, याची शक्यता नसल्याचं ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe