Health News Marathi :- सार्वजनिक शौचालयासारख्या ठिकाणी, जिथे जास्त लोक लघवी (Urine) करतात, तिथे काही वेळा लघवीचा असा वास येतो जो सहन करणे कठीण होते. लघवीतून दुर्गंधी येणे हे अगदी सामान्य आहे, परंतु काहीवेळा त्याचा दुर्गंध हे काही आजाराचे लक्षण असू शकते.
अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या आजारांमुळे तुमच्या लघवीतून दुर्गंधी येऊ शकते. यूटीआय- युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे.
जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा या समस्येचा सामना करावा लागतो. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रपिंड, मूत्राशय आणि त्याच्याशी जोडलेल्या नळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्याची वेळीच तपासणी केली नाही, तर संसर्ग किडनीमध्येही (Kidney) पसरू शकतो.
कमी पाणी पिणे- आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पीत नाही, तेव्हा हे टाकाऊ पदार्थ सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे लघवीला खूप उग्र वास येतो. अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
कॉफीचे अतिसेवन – कॉफीचे जास्त सेवन केल्याने लघवीला दुर्गंधी येऊ शकते. कॉफीमुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे तुमच्या लघवीला दुर्गंधी येऊ शकते.
मधुमेह (Diabetes) – ज्या लोकांना मधुमेह आहे हे माहीत नसते अशा लोकांच्या लघवीतूनही दुर्गंधी येऊ शकते. मधुमेही रुग्णांच्या शरीरात साखर पचवता येत नसल्याने असे घडते. त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंधी येते. मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जाणे हे देखील त्याचे एक लक्षण आहे.
STI – खराब लघवीचे एक मुख्य कारण लैंगिक संक्रमित संसर्ग किंवा STI असू शकते. कधीकधी या संक्रमणांमुळे मूत्रमार्गात जळजळ होऊ शकते ज्यामुळे लघवीचा वास बदलू शकतो. STI व्यतिरिक्त महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळीमुळे लघवीला वास येऊ शकतो.
यीस्ट इन्फेक्शन(Yeast Infections) – कॅन्डिडा नावाची बुरशी सामान्यतः आपल्या त्वचेवर असते. ही बुरशी महिलांच्या खाजगी भागासह शरीराच्या कोणत्याही भागात आढळू शकते. जेव्हा ही बुरशी खूप जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
ओले कपडे घालणे किंवा घाणीत राहणे इ. यस्ट इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना यीस्ट इन्फेक्शनच्या समस्येला अधिक सामोरे जावे लागते, ज्यामुळे लघवी करताना दुर्गंधी येते.
खाजगी भागात लालसरपणा, सूज आणि पांढरा स्त्राव यांसारखी इतर लक्षणे आहेत. यीस्ट संसर्गाची लक्षणे पुरुषांमध्येही आढळतात, परंतु ती महिलांइतकी तीव्र नसतात.