अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- हाडं कमजोर होण्यामुळे गुडघे, सांधे दुखतात याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस समस्या ही होते. कधी कधी हाइ एवढी अशक्त होतात की, केवळ शिंकण्याचाही हाडांच्या आरोज्यावर परिणाम होतो.
जसं वय वाढतं तशी हाडं कमजोर आणि नरम होतात. वय, पर्यावरणीय कारकं, जीवनशैली याचा शरीरावर होणारा परिणाम थांबवू शकत नाही. हाडं कमजोर होण्यामुळे गुडघे, सांधे दुखतात याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस समस्या ही होते. कधी कधी हाडं एवढी अशक्त होतात की, केवळ शिकण्याचाही हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
शरीराच्या ढाच्याला मजबूत करण्यात पुरेसा आणि निरोगी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आजच्या आधुनिक जीवनशैलीत निष्क्रियता वाढलेली आहे.
अधिक मद्यपान आणि तंबाखूचे सेवन याचे महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय आहारविषयक सवयी चा समावेश होतो. ज्यामध्ये आहार संबंधी विकार म्हणजे एनिरेक्सिया आणि आहारात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ड जीवनसत्त्व, यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची कमतरता ही सुद्धा काही कारणं आहेत.
आरोग्यदायी आहाराची भूमिका : – ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करण्यासाठी कॅल्शियम, प्रथिनं, मॅमेशियम आणि ड जीवनसत्त्व आहारात आवश्यक आहे. प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे डाळ, राजमा, चवळई, धान्यं, सुकामेवा, बिया शरीराच्या पेशींना निरोगी ठेवण्यास सहाय्यक न ठरतात. निरोगी पेशी हाडांना आधार देतात. लाल मांस आणि कॅफिन पासून दूर राहायला हवे.
ही तपासणी करून घ्या : – ड जीवनसत्त्व तपासणीच्या माध्यमातून शरीरातील कॅल्शियमची पातळी समजू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला किती कॅल्शियमची गरज आहे, हे समजते. ही कॅल्शियम डेन्सिटी टेस्टच्या तुलनेत चांगला पर्याय आहे.
दुष्परिणाम :- हाडांच्या कमजोरीमुळे वयाच्या पंचेचाळीसच्या जवळपास किंवा त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो. काही जणांमध्ये कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्यानंतर पोटात पचनाशी संबंधित समस्या होऊ लागतात. यामुळे अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणं बंद करतात. यामुळे हाडांची किंवा वेदनेची समस्या तशीच राहते. म्हणून डॉक्टरांना भेटून औषध बदलून घ्यायला हवीत.
केवळ औषधं फायदेशीर नाहीत : – हाडं कमजोर झाली असतील तर केवळ गोळ्या घेऊन उपयोग नाही. कॅल्शियमयुक्त आहाराची आवश्यकता यासाठी असते, कारण तेव्हाच गोळ्यांमधील कॅल्शियम शरीरात शोषले जाते यासाठी आहारात फळं, भाज्या, एक मूठभर बदाम, दुध यांचा समावेश करायला हवा. याशिवाय आहारात , फ्लॉवर, काही मासे म्हणजे सालमन आणि पालेभाज्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. जर हाडांच्या कमजोरीची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन केवळ आहारात बदल करूनही ही समस्या ठीक होऊ शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम