अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सर्वत्र नागरिक धास्तावले आहे. यातच या महामारीविरुद्ध सुरु असलेली जीवघेणी लढाई पाहता दवाखाना नको असाच पवित्रा नागरिक घेत आहे.
एकीकडे स्वतःसह परिसराची काळजी नागरिक घेताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यातील कचऱ्याचा ढीग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केडगाव बायपासलगत आणून टाकला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत अधिक महिती अशी कि, केडगाव बायपासनजीक रात्री कोणी तरी दवाखान्यातील कचरा आणून टाकला आहे.
सकाळी हा बेवारस पडलेला कचऱ्याचा ढीग परिसरात राहणाऱ्यांच्या लक्षात आला. दवाखान्यातील रुग्णांनी वापरलेल्या औषधांच्या बाटल्या, खाद्य पदार्थ, विविध वस्तू, सलाईनच्या बाटल्यांसह इतर कचरा टाकला आहे. यातून दुर्गंधी पसरत आहे.
दरम्यान जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने आधीच नागरिक धसतवाले आहे. यातच हा कचरा असाच बेवारस पडला तर तो कुजून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अनेक पाळीव पशू येथे चरण्यासाठी येतात.
त्यांच्याही जीविताला यापासून धोका होऊ शकतो. जिल्ह्यावर एवढे मोठे संकट घोंगावत असताना आरोग्याची काळजी घेणे किती महत्वाची आहे हे माहित असतानाही असा प्रकार हा लज्जास्पद आहे.
दरम्यान हा कचरा नेमक्या कोणत्या दवाखान्यातील आहे आणि त्याची योग्य विल्हेवाट न लावता तो बायपासला बेवारसपणे का टाकला, याची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम