Heart attack: उच्च रक्तदाबाचा परिणाम हृदयावर होतो का? जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Heart attack : रक्तदाब (Blood pressure) नियंत्रणात (Control) असणे खूप गरजेचे आहे. कारण रक्तदाब अनियंत्रित असणे म्हणजे खूप आजारांना (Illness) आमंत्रण आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये उपचार घेऊनही रक्तदाब नियंत्रणाबाहेर राहतो.

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयाचे आजार (Heart disease) हे मृत्यूचे मुख्य कारण आहे. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयाचा आकार मोठा होऊ शकतो. परिणामी त्याची आकुंचन-प्रसरण पावण्याची क्षमता कमी होऊ शकते. हृदयाचे ठोके(Heartbeat) अनियमित होतात.

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack) ते स्ट्रोकचा (Stroke) धोकाही वाढतो. यामुळे उच्च रक्तदाबामुळे शरीरातील रक्तवाहिन्या खराब होतात. यामुळेच मेंदूला इजा होण्याचा धोकाही वाढतो. याशिवाय ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने रुग्णाच्या आवाजावरही परिणाम होतो. मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.

‘ही’ समस्या देखील असू शकते

याशिवाय हाय बीपीमुळे स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या देखील होऊ शकते. वास्तविक, त्याचा मेंदूवर परिणाम झाल्याने स्मरणशक्तीही कमी होऊ शकते. यासोबतच उच्च रक्तदाबाची समस्या दीर्घकाळ राहिल्यास तुमची अल्पकालीन स्मरणशक्ती जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe