पुन्हा आस्मानी संकट ; हवामान विभागाचा इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-साताऱ्यासहित कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली.

त्यानंतर आता शनिवारी (दि. 10) राज्यातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भात गारपीटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात राज्यात सर्व ठिकाणी आकाश ढगाळ होते.

सायंकाळी साउेपाच वाजेपर्यंत सातारा १३, महाबळेश्वर १, ब्रम्हपुरी १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पुढील ४ दिवस पावसाची शक्यता आहे.

अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली,

उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण नोंदवलं गेले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काळे ढग दाटले आहेत.

त्यामुळे काल कोकणातील काही भागासह पाचगणी आणि सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News