पुढील पाच दिवस महाराष्ट्रात बरसणार धो धो पाऊस! ‘या’ ठिकाणी राहणार पावसाचा जोर अधिक, तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

Published on -

सध्या गेल्या दोन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पिकांना देखील जीवनदान मिळण्याची सध्या स्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये  पाणीसाठ्यात वाढ झाली असून त्या ठिकाणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील तूर्तास मिटलेला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने जोर पकडला असून राज्यातील मुंबई सह इतर जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे.जुलैमध्ये मान्सून चांगल्या पद्धतीने सक्रिय झाला परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याची स्थिती होती.परंतु पुन्हा आता पावसाने चांगल्या पद्धतीने जोर पकडला असून कोकणासह विदर्भ व मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये चांगला पाऊस होत आहे.

 पावसा संबंधी हवामान खात्याचा अंदाज

पावसा संबंधी जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर येणाऱ्या पाच दिवस महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील काही भागांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर राज्यातील काही विभागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येणारे पाच दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

 आज कोणत्या ठिकाणी आहे पावसाचा कोणता अलर्ट?

आजचा विचार केला तर पालघर तसेच रायगड या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येणारी दोन दिवस मध्य भारताच्या काही भागात देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व पुणे तसेच नाशिक या जिल्ह्यातील घाट परिसरात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. परंतु मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज आहे.

1- रेड अलर्ट आज पालघर, रायगड तसेच पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना अती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

2- ऑरेंज अलर्ट(20 जुलै)- उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील  यवतमाळ, चंद्रपूर,  गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3- ऑरेंज अलर्ट(21 जुलै)- त्यासोबतच 21 जुलै म्हणजेच परवासाठी रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe