अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- महाराष्ट्रात मुसळधार पावासाने हाहाकार माजवला आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळधार पाऊस पडत आहे.
त्यामुळे महामुंबईसह कोकण आणि इतर शहरे जलमय झाले आहे. कोकणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तर मध्य महाराष्ट्रालाही पूराचा तडाखा बसला आहे. दरम्यान, याच पूरस्थितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
मुसळधार पावसानं राज्यात थैमान घातलं आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
यावेळी त्यांनी अमित शाहांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली आहे. तसेच अमित शाहांकडूनही महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सर्वोतपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













