अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-हॅलो… हॅलो… आवाज येतोय का ? नाही आवाज येत नाही अशा गोष्टीमुळे सध्या श्रीगोंदमध्ये बीएसएनएलचे ग्राहक चांगलेच वैतागाले आहे.
भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवेतील नेहमीच्याच विस्कळीतपणामुळे भारत संचार निगमच्या ग्राहकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे श्रीगोंदा येथील शेकडो ग्राहकांनी सामूहिक संताप व्यक्त केला आहे.
सेवा नीट दिली नाही तर खासगी कंपन्यांकडे जाऊ, असा इशारा दिला. श्रीगोंदा तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी लेखी निवेदनाद्वारे बीएसएनएलच्या सेवेबाबत महाव्यवस्थापकांकडे तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे .
मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. बीएसएनएलच्या सेवेबाबत सुधारणा करण्यात याव्या यासाठी आता ग्राहक आक्रमक झाले आहे. ग्राहकांच्या अनेक तक्रारीनंतर देखील अधिकार्यांकडून याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी भ्रमणध्वनी सेवेतील गलथानपणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
निकृष्ठ सेवेमुळे निर्माण होतायत समस्यां :- इंटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांचे व्यवहार खोळंबतात. एवढेच नव्हे तर अनेकदा बँकांचे व्यवहारच बंद राहण्याची वेळ ‘बीएसएनएल’मुळे येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|