अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- एकीकडे कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याने आज प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणुस दैनंदिन जीवनात पुरता वैतागला आहे. त्यातच परत ग्रामीण भागात भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छाद मांडला आहे.
यापुर्वी पैसा अडका व मौल्यवान वस्तुंची चोरी केली जात असे मात्र कोरोनाने चोर आता शेतकऱ्यांची जनावरेच चोरी करू लागले आहेत.
नुकतीच चोरट्यांनी शेतकऱ्यांची बैल व गाय पीकअप व्हॅनमध्ये घेवून निघाले मात्र दुचाकीस्वारंानी त्यांचा पाठलाग केल्याने चोरांची गाडी उलटली व त्यांना जनावरे सोडून पळ काढावा लागला. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथील शेतकऱ्यांचे तिन बैल व एक गाय चोरट्यांनी चारचाकी वाहनातुन चोरुन चालविली होती. मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या वाहनाचा पाठलाग केला.
यावेळी वाहन पलटी झाले. चोरटे पसार झाले. वाहन उलटल्याने चोरट्यांनी बैल तेथेचे सोडून दिले मात्र एक गाय घेवून अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले.दरम्यान गाडीचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक जमा झाले.
त्यांनी गाडीतील बैलांची सुटका केली. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम