अहो आश्चर्यम ! आंबा बागेच्या सुरक्षेला ११ विदेशी कुत्रे व ८ सीसीटीव्ही कॅमेरे, अडीच लाख रुपये किलोने विक्री..

Published on -

एका आंब्याच्या बागेच्या सुरक्षेसाठी ११ विदेशी कुत्रे २४ तास आंब्याची देखरेख करतात. या आमराईला मोठे कुंपण लावले आहेत. तसेच ८ सीसीटीव्ही कॅमेरे आंब्यासाठी लावले आहेत. ऐकून जरा धक्काच बसला असेल ना? पण हे वास्तव आहे.

हा आंबा अगदी मौल्यवान असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ‘मियाजाकी’ असे त्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा साधारण अडीच लाख रुपये प्रतिकिलो विकला जातोय. या आंब्याची शेती विदेशातच केली जात होती.

आता भारतात होत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील शेतकरी संकल्प सिंह परिहार हे याची शेती करतात व या पिकवलेल्या आंब्यासाठी मोठी सुरक्षा तैनात केलीये. या ठिकाणी ‘मियाजाकी’ आंब्यासोबत मल्लिका, आम्रपाली, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खासयासह २४ जातींचे आंबे आहेत.

नर्मदा किनारी शेती शेतकरी संकल्पसिंह परिहार यांच्या शेतात ‘मियाजाकी आंब्यासोबत मल्लिका, आम्रपाली, काळा आंबा, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, टाईयो नो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन,

गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खासया सह २४ जातींचे आंबे आहेत. संकल्प यांच्या बागेतील संपूर्ण आंबे त्यांच्या बागेतूनच विकले जातात त्यांना बाजारात जाण्याची गरज पडत नाही. जबलपूरमध्ये नर्मदा नदीच्या किनारी त्यांची शेती आहे.

अगदी आधुनिक पद्धतीची जोड देत ते शेती करतात. पहिला आंबा भगवान महाकालसाठी संकल्पसिंह परिहार म्हणतात, आमच्या बागेतील प्रत्येक प्रकारच्या आंब्याचे पहिले फळ सर्वप्रथम भगवान महाकाल (उज्जैन येथील ज्योतिर्लिंग) अर्पण करण्यासाठी जातो.

त्यानंतर आम्ही आंब्याची बाजारात विक्री करतो. संकल्प यांची आंब्याची बाग जबलपूर शहरापासून जवळ असल्याने या बाबत अनेकांना माहिती झालेली आहे त्यामुळेच आंबे चोरण्याचा अनेकदा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे एखाद्या मौल्यवान वस्तुप्रमाणेच बागेचे रक्षण ते करत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News