अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- श्रीरामुर तालुक्यात वयापारी हत्याकांड सारखा धक्कादायक प्रकार घडलेला असताना. पुन्हा एक नवीन गुन्हा घडला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला पळविण्याचा प्रयत्न मुलीच्या हुशारीमुळे फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भागवतनगर, बेलापूर येथे राहणारी मुलगी संध्याकाळच्या सुमारास आपल्या आईसोबत घरी येत होती.
घरासमोर आल्यावर आई घराचा दरवाजा उघडत असतानाच एक मुलगा अचानक आला व त्याने आई समोरच मुलीचे तोंड दाबले. मुलीने प्रसंगावधान राखून तोंड दाबलेल्या हाताला कडकडून चावा घेतला.
त्यामुळे त्याने मुलीला सोडून पळ काढला. या घटनेमुळे सदर कुटुंब भयभीत झाले आहे. दरम्यान,उपसरपंच अभिषेक खंडागळे, शिवसेना शहर प्रमुख अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी संबधीत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पालकवर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|