त्याने कष्टाने घेतलेला फोन पडला डबक्यात आणि नको तेच झाले….

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे बसस्थानक चौकातील रस्त्याचे खड्ड्यात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या डबक्यातील पाण्यात एका दुचाकीस्वराचा नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल पडल्याने तो निकामी झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान नेवासा-शेवगाव महामार्गावर नेवासा फाटा ते कुकाणा दरम्यान रस्त्यावर मोठं मोठाली खड्डे पडली असून ही अपघातास कारणीभूत ठरत आलेली खड्डे बुजवावीत अशी मागणी होत आहे.

भेंडा येथे बसस्थानक चौकातील रस्त्याचे खड्ड्यात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या डबक्यातील पाण्यात पडलेला नवा कोरा अँड्रॉइड मोबाईल शोधतांना मोबाईल मालक व त्याचे मित्रांना मोठी कसरत करावी लागली.

 

पाण्यात उतरून खड्ड्यातील पाणी उपसत मोबाईल शोधण्याचे काम केले. मात्र नवा कोरा मोबाईल पाण्यात पडल्याने त्याचे नवंपण देखील फिटले नाही तोच त्याची खड्ड्यातील पाण्याने दुरावस्था केली.

दरम्यान नागपूर फाटा ते सौंदाळा दरम्यान डांबरी रस्त्यावर मोठी आणि खोल खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावर दोन वहाने जातांना डांबरी रस्त्याचे खाली वहान उतरविणे धोक्याचे ठरत आहेत.

दुचाकी व चार चाकी वहान चालवताना नेमका कोणता खड्डा हुकवावा हा प्रश्न पडतो. वेगाने गाडी खड्डयात गेल्याने अनेक अपघात होऊन दुखापती होत आहेत.

त्यामुळे हा रस्ता आणि रस्त्यावरील खड्डे अपघाताला कारणीभुत ठरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या साईड पट्ट्या व खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे.