बाबा रामदेवांना दणका; १ हजार कोटी रुपयांचा …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने आज योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

असोसिएशनने हे प्रकरण बाबा रामदेव सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या आधारे केले आहे, ज्यामध्ये बाबा अ‍ॅलोपॅथीला उपचाराला बकवास व कचरा विज्ञान म्हटले आहे. मात्र, या घटनेवर नंतर रामदेव बाबांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले.

पंरतु आयएमएच्या म्हणण्यानुसार रामदेव यांनी दिलेल्या निवेदनाला उत्तर म्हणून, जर त्यांनी येत्या १५ दिवसांत सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ काढला नाही आणि लेखी माफी मागितली नाही तर त्यांच्याकडून १ हजार कोटी रुपयांची भरपाई मागितली जाईल, अशी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला होता.

आयएमएने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठविली. रामदेव यांच्यावर खटला चालविण्याची मागणीही डॉक्टरांच्या समितीने केली होती. मात्र रामदेव यांच्या पतंजली या संस्थेने हे आरोप खोटे असल्याचा निषेध करत निवेदन जारी केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe