अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पेटविण्यात आली.
होळीत मावा, गुटखा, तंबाखू, विडी, दारुच्या बाटल्या, सिगारेट टाकून आमली पदार्थांचे दहण करण्यात आले. पै.नाना डोंगरे म्हणाले की, युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.
टांळेबंदीनंतरच्या काळात युवकांमध्ये नैराश्य निर्माण होऊन व्यसनाधिनता वाढली आहे. तंबाखू, विडी सिगारेटमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, दारुने संसार उध्वस्त होत आहे. युवकांनी व्यसनांची होळी करुन निरोगी जीवन जगावे.
होळीसाठी लाकूड न जाळता वाळलेला पाला, पाचोळा जाळल्यास एक पर्यावरणपुरक होळी साजरी करता येणार आहे. गावात स्वच्छता मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.
यामुळे गाव निर्मळ व निरोगी होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. तर पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|