शासनाच्या पोकळ घोषणा; रिक्षाचालक आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेतच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने राज्य शाहसाने पुन्हा एकदा राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना घरीच बसण्याची वेळ ओढवली आहे.

यामुळे यंदा शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करत हातावर पोट असणाऱ्यांना दीड हजार रुपये सानुग्रह आनुदानाची घोषणा केली.

मात्र अद्यापही रिक्षा चालक अनुदानाच्या प्रतिक्षेतच आहे. शासनाने मदतीची घोषणा केली असून, परवानाधारक रिक्षाचालकांनाही प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

मदत जाहीर करून पंधरा दिवस उलटून गेले असले तरी रिक्षाचालकांना अद्यापपर्यंत ही मदत मिळालेली नाही. जिल्ह्यात नऊ हजार ६०६ परवानाधारक रिक्षाचालक आहेत.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी नसल्याने अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात शासनाने जाहीर केलेली मदत तत्काळ मिळावी, अशी मागणी रिक्षाचालकांमधून होत

आहे. तसेच शासनाने ही मदत तातडीने द्यावी, यासाठी रिक्षाचालक संघटनेचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe