Home Loan: ‘या’ बँकांकडून स्वस्त व्याजदरात घ्या होमलोन आणि पूर्ण करा स्वतःच्या घराचे स्वप्न! वाचा पटकन बँकांची यादी

Ajay Patil
Published:
home loan

Home Loan:- अनेक बँकांच्या माध्यमातून आता अगदी साध्या व सोप्या पद्धतीने होमलोन दिले जात असल्यामुळे प्रत्येकाला सहजासहजी स्वतःच्या स्वप्नातील घर घेणे शक्य झालेले आहे. होम लोन घ्यायचे असेल तर ते आता जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून दिले जाते.

परंतु जेव्हा आपण कुठलेही कर्ज घेतो तेव्हा आपल्याला बँकांकडून त्या कर्जावर व्याजदर आकारला जातो व या व्याजदराचा प्रभाव हा कर्ज परतफेडीवर होत असतो. त्यामुळे जर आपण घेत असलेल्या कुठल्याही प्रकारच्या कर्जावर आकारण्यात आलेला व्याजदर जर कमी असेल तर आपला बऱ्यापैकी पैसा वाचतो.

अगदी हीच बाब होमलोनला देखील लागू होते. कारण हे दीर्घ कालावधीचे लोन असते व या लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदर जर कमी असेल म्हणजे जर आपल्याला स्वस्तात गृह कर्ज मिळाले तर आपल्या घराचे स्वप्न ही पूर्ण होते व पैसा देखील कमी लागतो.

त्यामुळे जर तुम्हाला देखील नवीन घर खरेदी करायचे असेल तर  आता अनेक बँकांनी होम लोनच्या व्याजदरात कपात केलेली आहे. त्यामुळे आता नवीन घर घेणे स्वस्त झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

तुम्ही अगदी काही कागदपत्रे बँकेला जमा करून होम लोन घेऊ शकतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोणत्या बँकेच्या माध्यमातून होम लोनवर किती व्याजदर आकारला जात आहे? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.

 या बँकांकडून मिळेल स्वस्त व्याजदरात होमलोन

1- बँक ऑफ इंडिया तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदर 8.30 ते 10.75%

2- पंजाब नॅशनल बँक तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजदर 8.45% ते 10.25 टक्के

3- युको बँक तीस लाख रुपये होम लोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.45 ते 10.30%

4- स्टेट बँक ऑफ इंडिया तीस लाख रुपये होमलोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.40 ते 10.15%

5- बँक ऑफ बडोदा तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणारा व्याजदर 8.40 ते 10.65%

6- पंजाब अँड सिंध बॅंक तीस लाख रुपये होम लोनवर आकारण्यात येणारा व्याजदर 8.50 ते 10%

7- युनियन बँक ऑफ इंडिया तीस लाख रुपये होम लोन वर आकारण्यात येणारा व्याजदर 8.35 ते 10.75 टक्के

सध्या प्राप्त माहितीनुसार बँक ऑफ इंडिया ही सर्वात कमी व्याजदराने होमलोन देत आहे. जर आपण बँक ऑफ इंडियाचा होम लोनचा दर पाहिला तर तो साधारणपणे 8.30 टक्क्यांच्या आसपास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe