अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा हनी ट्रॅप ! मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- शरीरसंबंधाचे अश्लील व्हीडीओ तयार करून ब्लॅकमेल करणारी महिला तिच्या जोडीदारासह पोलिसांनी गजाआड केली आहे. नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणात मोठे रॅकेट’ उघडकीस येण्याची शक्यता अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. पञकारांशी बोलताना सांगितले. अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक राजेद्र सानप यांनी ही माहिती दिली.

फिर्यादीच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६ एप्रिल २०२१ रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगणमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवुन त्यांचेतील महिलेसबोत शरिरसंबध ठेवणेस भागपाडुन त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता.

एक कोटी रुपये आणून दे नाहीतर तो अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी आरोपी महिलेने दिली होती.

फिर्यादीच्या गळ्यात असणारे ५ तोळे वजनाची २ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन, हातातील साडेसहा तोळे वजनाच्या ४ अंगठ्या व रोख रक्कम ८४ हजार ३०० रुपये असा एकुण ५ लाख ४४ हजार ३०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी महिला व तिला मदत करणा-यास अटक करण्यात आली आहे.

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेद्र सानप यांनी पोलिस पथकासह जखनगाव येथे राहणारी आरोपी महिला हिस ताब्यात घेऊन तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली.

यावेळी सदरचा गुन्हा हा तिने व तिचा साथीदार मिळून केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या साथीदारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

महिलेने ही चेन भिंगार अर्बन बँक येथे तिने तिच्या भावाच्या नावे गहाण ठेवली होती. ती बँकेतून ताब्यात घेण्यात आली आहे.

तसेच तिच्या घरामधे या गुन्ह्यातील अंगठी व रोख रक्कम ६९ हजार ३००रुपये जप्त करण्यात आली. तिचा साथीदार याचेकडुन गुन्ह्यातील १५ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सानप यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe