कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, परेश पुरोहित, गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे, गणेश शिंदे, संतोष साळवे, पोपट पात्रे, दीपक दांगट, गणेश मराठे आदि सर्व पदाधिकारी उपस्थित होते

कोरोना काळामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांना नातेवाईक देखील हात लावत नव्हते या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण, संजय जगताप, भाऊसाहेब भिंगारदिवे,

भाऊ साळवे यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देत प्रतीक बारसे म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही केलेल्या कार्याचे कौतुक करून सन्मान करण्यात आले त्यामुळे येणाऱ्या संकटकाळात देखील आम्ही अशीच मदत करत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News