विनापरवाना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे ते हॉस्पिटल सील !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-विनापरवाना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आढळल्याने तालुक्यातील साकुर येथील दोन रुग्णालयांना काल सायंकाळी सील ठोकण्यात आले आहे.

प्रांताधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.साकुर येथील दोन रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून परवानगी नसतानाही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते.

याबाबत प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना माहिती समजली. दुपारी चार वाजेच्या प्रांताधिका‍ऱ्यांनी साकुर येथे जाऊन ही कारवाई केली. त्यांच्यासोबत तहसीलदार अमोल निकम,

गट विकास अधिकारी सुरेश शिंदे हे होते. या अधिकाऱ्यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केली असता या रुग्णालयांमध्ये विनापरवाना रॅपिड एंटीजन किटद्वारे कोरोना रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे आढळले. यामुळे या रुग्णालयांना त्वरित सील करण्यात आले.

यावेळी अधिकाऱ्यांनी रुग्णालयांची अधिक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी साकुर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना सूचना केल्या आहेत .

या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापयंर्त या रुग्णालया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News