वाढती आकडेवारी कशी रोखणार? तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-सरकारने १ एप्रीलपासून ४५ वर्ष वयावरील सर्वांना लस मिळेल ही घोषणा केली आहे. मात्र राहाता तालुक्यामध्ये लस शिल्लक नसल्याने

ज्येेष्ठ नागरिकांबरोबर आता नविन गर्दीचीही भर पडत असून संबंधित डॉक्टर व स्टाफला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

राहाता तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालये व सहा प्राथमीक आरोग्य केंद्रे तसेच शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात व प्रवरा ग्रामीण रुग्णालयात कोव्हिडची लस दिली जात असून यात सरकारी रुग्णालयात मोफत तर लोणी व शिर्डीतील दोन्ही दवाखान्यांत विकत लस मिळते.

मात्र गेल्या सात दिवसांपासून राहाता ग्रामीण रुग्णालयासह इतर सर्वच ठिकाणी लस शिल्लक नसल्याने नागरिकांना लस मिळत नाही त्यामुळे मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.

तालुक्यात दिवसभरात 63 करोना पॉझिटीव्ह रुग्ण निघाले असून राहाता शिर्डीत काही प्रमाणावर दिलासादायक चित्र समोर आले असले तरी लोणीत 19 रुग्ण सापडले शिर्डी 9, राहाता 5, कोल्हार 6, साकुरी 3,

गोगलगाव 4 प्रवरानगर 3 रुग्ण सापडले तर इतर गावांतील रुग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झालेली दिसून आली असून तालुक्यात करोना टेस्ट मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आल्या असून 500 हून अधिक टेस्ट केल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News