अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , सध्या कोरोना संसर्ग नियत्रंणात आणण्यासाठी सर्व बाजार समितीमधील शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले आहेत .
यामुळे नगर बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला , अन्नधान्य व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत .
सध्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होत असुन, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे . सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना
शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्री करून -बियाणे , खते , औषधे , शेती अवजारे वेळेत मिळणे गरजेचे आहे . यामुळे बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे , भाजीपाला व भुसार माल तसेच नेप्ती उपबाजारातील फळे, भाजीपाला व कांदा व्यवहार सुरू केल्यास
शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री हाईल .आलेल्या पैशातुन शेतकरी खते बियाणे , शेती पुरक अवजारे यांची खरेदी करतील . कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करून वेळेची मर्यादा घालुन देऊन बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्याची मागणी सभापती घिगे यांनी केली आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम