आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण, जर बेपर्वाई झाली असेल तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे.

मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने ही दुर्घटना घडली.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे.

मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe