प्राध्यापकाकडून पती-पत्नीला बेदम मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-पपईचे झाड उपटल्याच्या कारणातून पती पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना अकोले तालुक्यातील रुंभोडी या गावात घडली आहे.,

या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात प्राध्यापक सुनील एकनाथ मालुंजकर याच्यासह पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रकाश आनंदा मालुंजकर हे आपल्या घरात बसलेले असतांना त्यांना बाहेर बोलावून पपईचे झाड तुम्हीच उपटले असे म्हणत

त्यांना आणि त्यांच्या पत्नीला प्राध्यापक सुनील एकनाथ मालुंजकर,शुभम सुनील मालुंजकर,अजय बाळासाहेब पावसे,कांता बाळासाहेब पावसे,

बाळासाहेब आनंदा पावसे यांनी मारहाण केली,या मारहाणीत दोघे नवरा बायको जखमी झाले असून त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे,

पोलीस ठाण्यात प्राध्यापक सुनील एकनाथ मालुंजकर,शुभम सुनील मालुंजकर,अजय बाळासाहेब पावसे,कांता बाळासाहेब पावसे,बाळासाहेब आनंदा पावसे यांच्यावर कलम 143,147,148,149,324,323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय,या घटनेचा तपास हवालदार सय्यद हे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe