अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- शेतात काम करत आलेल्या पती पत्नीस तू आमच्या जमिनित काय करतो असे विचारल्यानंतर ही जमीन माझी आहे असे म्हणातच चौघांनी त्या पतीपत्नीस काठीने मारहाण करून जखमी केले.
ही घटना पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील ठाकर वस्ती येथे घडली आहे. या मारहाणीत कोंडीभाऊ जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा जाधव हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती नुसार शहाजापूर येथील ठाकर वस्तीवरील आपल्या शेतात कोंडीभाऊ महादु जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा शेतकाम करत होते. यावेळी दिलीप राजू जाधव, सुनिल बाबाजी जाधव,
राजू चंदर जाधव, सुभाबाई राजू जाधव हे तेथे आले व फिर्यादिस तू आमच्या जमिनीत काय करतो? असे विचारल्यावर ही जमिन माझी आहे ‘
असे तो म्हणताच दिलीप जाधव याने फिर्यादिच्या डोक्यात काठी मारून त्यास जखमी केले व सुभाबाई जाधव यांनी फिर्यादिची पत्नी रेश्मा हिस हाताने मारहाण केली व इतर दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम