अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- माहेरी असलेल्या विवाहितेने नांदायला नाकार दिल्याने पतीने तिला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पती व सासरच्या मंडळीनी मारहाण करून शिवीगाळ केली.
ही घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली.या प्रकरणी पैठणतालुक्यातील चितेगाव येथील पाच जणांवर सोनई पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कावेरी विशाल चव्हाण हीला पती विशाल टाबर चव्हाण व सासरकडील लोकांनी नांदायला नकार दिल्याने
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘तू जर आमच्याकडे नांदायला येत नसशील, तर तुला जीवे मारून टाकू’, अशी धमकी दिली.
यावेळी पती विशाल चव्हाण याने चाकुने मारण्याचा प्रयत्न केला; पण तो हुकला. त्यानंतर डोक्यात गजाने मारून पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. यावरून सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम