माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने ‘मी’ आत्महत्या करतोय…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – एकाने फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने मी आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यूला शेतकरी आत्महत्या समजू नये असा मजकूर टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हा प्रकार राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे घडला आहे. तर अनिल प्रभाकर उदावंत (वय 42) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अनिल उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.

त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले आहेत. बुधवार दि. 10 रोजी रात्री अनिलचा प्रवरा रुग्णालयात मृत्यू झाला.

अनिल मंगळवारी सकाळी लोणी पोलीस ठाण्यात आला होता. अधिक माहिती देताना लोणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्या हातात विषाची बाटली होती. तो विष पिऊन आलेला होता.

परिस्थितीचे गांभीर्य बघून पोलिसांनी त्याला प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु त्याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe