राज्यातील जेवढे खासदार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी आणला – खासदार डॉ. सुजय विखे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-जिल्ह्यात ५० वर्षांपासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहे. विखे घराणे राजकीयदृष्ट्या संपले, तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही,

असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार राम शिंदे उपस्थित नव्हते याबाबत वेगळीच चर्चा होती.

येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी जगन्नाथ राळेभात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद,

युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्रा. अरुण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेभात, रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेभात, अॅड. प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशिद आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार विखे म्हणाले, राज्यातील जेवढे खासदार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आणला. पण प्रसिद्धी केली नाही.

परंतु येथील आमदार हा निधी मीच आणला असे सोशल मीडियावर सांगत आहेत. जे काम आपण केले नाही त्याचे श्रेय घेऊ नये, याबाबत मी जनतेत जाऊन निधी आणल्याचे सांगणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News