‘हे’ मंत्री म्हणतात, टोटल लॉकडाऊन करण्यास मी आग्रही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- टोटल लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही आहे. तशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा या संबंधी भेटणार आहे, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे.

रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानण्यात येत आहे.

भुजबळ नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, सध्या नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले आहे. सध्या ऑक्सीजनची 139 मेट्रिक टन एवढी मागणी आहे. मात्र हातात फक्त 87 टन ऑक्सिजन उपलब्ध आहे.

जीवनावश्यक गोष्टीसाठी फिरण्याच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत आहेत. ही परिस्थिती वाईट आहे. कोरोनाची लक्षण जाणवत असल्याच हयगय करु नये असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. गरज नसताना मोकाट फिरणारे सुपर स्प्रेडर ठरताहेत.

कोरोनासदृश कोणतीही कोणतीही लक्षणं असली तर रुग्णालयात दाखल व्हा, असे भूजबळ म्हणाले. तसेच सध्या नाशिमधील बेड्सची क्षमता 2000 ने वाढवलेली आहे. कुंभमेळ्यावरून परत येणाऱ्यांनी ताबडतोब कोरोना चाचणी करुन घ्यावी, असेसुद्धा भुजबळ म्हणाले.

सध्या राज्यासह नाशिक जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडेसिव्हीरची गरज नाही. मी स्वतः रेमडेसिव्हीर घेतलेलं नाही. रेमडेसिव्हीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही.

या इंजेक्शनचे काही दुष्परिणामही आहेत, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान, टोटल लॉकडाऊन करा अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.

अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचीसुद्धा लॉकडाऊन करा, अशी मागणी आहे. त्यानुसार नाशिकला लॉकडाऊन करा ही माझी मागणी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे, असे भुजबळ म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe