अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.
राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या ओळखीच्या इसमाने घरात कोणी नसल्याचे पाहून विनयभंग केला या वरून राहुरी पोलिसात संतोष धनवडे (राहणार जोगेश्वरी आखाडा) याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि, जोगेश्वरी आखाडा येथे राहणार संतोष धनवडे याने विवाहित शिक्षिकेला तु मला फार आवडते असे म्हणुन ३० वर्षिय शिक्षिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून संतोष धनवडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे .
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|