अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई केल्याने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधीचे दप्तर तपासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली.
राहुरी तहसील कार्यालयात रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी मंत्री तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे ना.तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधित दप्तर तपासणी केली.
यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली, तसेच सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास व्हायला नको, अशी तंबी दिली. राहुरी तहसील कार्यालयात नवीन रेशनकार्ड बनविणे, दुबार प्रत काढणे, नाब कमी करणे किंवा समाविष्ट करणे, या कामांसाठी दिरंगाई होत आहे.
अशा तक्रारी काही लोकांनी थेट ना.तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. या दखल घेत ना.तनपुरे यांनी तहसील कार्यलयात जाऊन रेशनकार्ड संबंधीचे दप्तर तपासून पाहिले. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या.
संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत. अशी दप्तरदिरंगाई चालणार नाही. यानंतर परत कधी आलो, तर सर्व कामांची दप्तर नोंद व्यवस्थित दिसली पाहीजे. दलालांमार्फत तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरीकांची आर्थिक लूट होऊ नये.
तसेच सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी सहन करणार नाही. असा सज्जड इशारा यावेळी तनपुरे यांनी दिला.
लाभार्थ्यांना रेशनकार्डवर धान्यपुरवठा व्यवस्थित झाला पाहीजे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|