‘माझे व्याजाचे पैसे दिले नाही तर बघून घेईन…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील सावकारकी चांगलीच गाजली असताना एका मोठ्या सावकाराला नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..या सावकाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

तसेच नाना उर्फ बजरंग दौलत काळे (रा.परीटवाडी ता.कर्जत) असे या खाजगी सावकाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राशीन येथे राहणाऱ्या एका महिलेने कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती की, मी व माझा मुलगा महेश याने नाना उर्फ बजरंग दौलत काळे (रा.परीटवाडी ता.कर्जत) याच्याकडून ७ लाख १० हजार रुपये घेतले होते.

या सर्व रकमेचे तब्बल २२ लाख रुपये व्याजापोटी दिले. एवढी रक्कम देऊनही अजुन १० लाख ५० हजार रकमेची मागणी सावकाराने केली. पैशासाठी सावकाराने फिर्यादीचा मुलगा महेश याला रस्त्यात अडवून शिवीगाळ व दमदाटी करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. सावकाराच्या भीतीपोटी महेश वर्षभर पुणे येथे निघून गेला होता.

सावकार काळे हा फिर्यादीच्या घरी येऊन तुझा मुलगा कुठं गेला आहे?त्याचा मोबाईल नंबर सांग? असे म्हणत धक्काबुक्की व शिवीगाळ करत ‘माझे व्याजाचे पैसे दिले नाही तर बघून घेईन.’असा वारंवार दम देत होता. तसेच मुलगा महेशला मारून टाकण्याची धमकी दिली होती.

सावकारकीचा कोणताही परवाना नसलेल्या या सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी सावकार नाना काळे हा फरार होता त्याने जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. कर्जत पोलिसांनी ताकद लावत त्याचा जामीन नामंजुर करून घेतला.

कर्जत पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आले. तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आरोपीने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळातच त्यास अटक करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe