ICC World Cup 2023 : ‘या’ शेअर्सना होणार ICC वर्ल्डकपचा फायदा, तुम्ही केलाय का खरेदी? जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
ICC World Cup 2023

ICC World Cup 2023 : नुकतीच आशिया कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत श्रीलंकेवर 10 गडी राखून भारतीय संघाचा दणदणीत विजय झाला. आता लवकरच ICC क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. याचा फायदा काही कंपन्यांना होणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे या कंपन्यांचे शेअर्स असतील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आयसीसी विश्वचषकादरम्यान तुम्हाला शेअर मार्केटमधून जास्तीत जास्त कमाई करता येईल. कोणत्या आहेत या कंपन्या? जाणून घ्या सविस्तर माहिती.

ज्युबिलंट फूडवर्क्स

येणारा आयसीसी विश्वचषक आणि सुट्टीच्या हंगामातून सर्वात जास्त फायदा मिळवणारे दुसरे क्षेत्र म्हणजे खाद्य उद्योग होय. वास्तविक आपल्या आवडत्या संघांचे सामने पाहण्यासाठी येणारे चाहते जेवणावर नक्कीच खर्च करतात. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड ही किरकोळ खाद्य कंपनी असून डंकिन डोनट्स, डोमिनोज आणि पोपिएज सारखे अनेक आंतरराष्ट्रीय खाद्य ब्रँड आहेत. यात Hong’s Kitchen आणि Ekdam सारखे अनेक देशांतर्गत ब्रँडचा देखील समावेश आहे.

इंटरग्लोब एव्हिएशन

आगामी क्रिकेट विश्वचषकाचा मोठा फायदा विमान वाहतूक उद्योगालाही होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड ही इंडिगो म्हणून ओळखली जाते. बाजारपेठेतील हिश्श्याच्या दृष्टीकोनातून देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असून कंपनीचा भारतीय विमान उद्योगात (जून 2023 पर्यंत) एकूण 63.2% बाजार हिस्सा आहे. विमान प्रवासाची मागणी वाढली तर कंपनी सर्वात जास्त फायदेशीर स्थितीत असेल.

इंडियन हॉटेल्स कंपनी

त्याशिवाय सर्वात जास्त फायदा हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला होऊ शकतो. बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, लखनौ, धर्मशाला, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे या १० शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या शहरांमध्ये बहुतेक हॉटेल्स 100% व्यापण्याची अपेक्षा आहे. याचा इंडियन हॉटेल्स कंपनीला चांगला नफा होऊ शकतो. कंपनीची या शहरांमध्ये ताज, सिलेक्शन, विवांता, जिंजर, द गेटवे आणि ट्रेल्ससह यांसारखी अनेक हॉटेल्स आहेत.

Zomato

ही ऑनलाइन अन्न वितरण कंपनी असून ऑर्डर शिवाय, कंपनी विश्वचषकादरम्यान रेस्टॉरंट भागीदारीमध्ये वाढ पाहू शकते. कंपनी आपल्या जास्त वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विपणन मोहिम आणि विशेष सवलत देण्याची शक्यता आहे.

वरुण बेव्हरेजेस

हे पेप्सिकोचे वितरक असून विश्वचषकादरम्यान शीतपेयांच्या विक्रीत वाढ झाली तर याचा फायदा या कंपनीला होईल. दरम्यान, मोठं-मोठ्या खेळांमध्ये शीतपेयांचा वापर वाढतो आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळते. तसेच, खर्च आणि स्पर्धा व्यवस्थापित करत असताना कंपनी या संधींचा किती चांगला फायदा घेते यावर यश अवलंबून असणार आहे, हे लक्षात ठेवा.

युनायटेड स्पिरिट्स

युनायटेड स्पिरिट्स ही देशातील सर्वात लोकप्रिय दारू कंपनी असून अनेकजण उत्सव साजरा करण्यासाठी दारूचा वापर करतात. अशा स्थितीत युनायटेड स्पिरिट्सची विश्वचषकादरम्यान जास्त विक्री होण्याची शक्यता आहे. लाइव्ह क्रिकेट पाहण्यासाठी पार्ट्या आणि गेम इव्हेंट्सची संख्या जशी वाढत जाईल तसे मद्य सेवन वाढेल. याचाच असा अर्थ आहे की कंपनीच्या विक्रीत देखील खूप वाढ होईल.

IRCTC

वास्तविक खर्च जास्त असल्याने प्रत्येकजण विमानाने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे भारतीय रेल्वे सर्वात किफायतशीर आणि सुलभ पर्याय आहे. आगामी विश्वचषकादरम्यान, मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी सामने पाहण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणार असून . याचा फायदा IRCTC ला होऊ शकतो. ही कंपनी फक्त ऑनलाइन रेल्वे तिकीटच नाही, तर ती टूर पॅकेज, प्रवासादरम्यानचे खाद्यपदार्थ देखील पुरवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe