अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवत फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात “आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास
त्यांनी न घाबरता पुढे यावे व तक्रार द्यावी आलेल्या तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल,” असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी (ता. २१) करमाळा पोलिस स्टेशनला भेट दिली, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी सवांद साधत आणखी कोणी मनोहर भोसले याच्याकडून फसवले गेले असल्यास त्यांनी न घाबरता तक्रार करण्याचे आवाहनही यावेळी केले.
तसेच मनोहर भोसले प्रकरणात संशयित आरोपीला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, एक संशयित आरोपी बारामती पोलिसांच्या ताब्यात आहे.
तपासात काही जबाब घेतले जाणार आहेत. त्यातून जे समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई होईल, तसेच कोणत्याही नागरिकांवर अन्याय – अत्याचार होत असेल तर तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे यावे असेही पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या. त्याचबरोबर मनोहर भोसले प्रकरणात दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
त्यातील एकाला नोटीस दिलेली आहे तर दुसऱ्या तक्रारीत प्राथमिक चौकशी सुरू आहे, त्यात काही तथ्य आढळले तर पुढील प्रक्रिया केली जाईल, कायदा हा सर्वांना समान असून, कायद्यापुढे सर्व समान आहेत. असेही सातपुते यावेळी म्हणाल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम