केडगाव-नेप्ती रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्तीन झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  केडगाव-नेप्ती रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची ८ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका सुनीता कोतकर यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या मागणीचे निवेदन विभागाचे कुलकर्णी यांना संग्राम कोतकर, युवराज कोतकर, बबलू कोतकर, मंगेश मोटे, गौरव कार्ले, दत्ता कोतकर, प्रवीण उगलमुगले यांनी दिले. यावेळी अभियंत्यांना या रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देत रस्ता मजबुतीकरणाची मागणी करण्यात आली.

निवेदनात नगरसेविका कोतकर यांनी म्हटले आहे की, केडगाव-नेप्ती मार्गावर कांदा मार्केट आहे. त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना मज्जाव करावा, तसेच या वाहनांनी केडगाव बायपासचा वापर करण्याबाबत उपाययोजना कराव्यात.

या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटेमोठे अपघात होतात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटेमोठे अपघात होतात. या अपघातात आजपर्यंत अनेकजण जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

या रस्त्याच्या दुरावस्थेचा या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलावीत. केडगाव-नेप्ती रस्त्याची दुरुस्ती करावी, काम सुरू न झाल्यास शिवसेना व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून शिवसेना स्टाईल आंदोलन छेडले जाईल.

या आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा नगरसेविका सुनीता कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe