सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीचा पाईपलाईनवर अनधिकृत जोड दिल्याने

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकारीच्या दालनात आंदोलन केले.

यावेळी मुख्याधिकारी गर्कल यांनी पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.सावतानगर उपनगरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली आहे. परंतु, या पीव्हीसी पाईपलाईनवर अनाधिकृत जोड आहे.

तसेच हंडीनिमगाव शिवरातील नागरीकांसाठी याच लाईला पाईप जोडल्याने अनेक दिवसांपासून सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. येथील नागरीक कुपनलिकेचे पाणी वापरत होते. परंतु, कुपनलिकेचे पाणी राहिले नसल्याने व नगरपंचायतचा पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मुख्याधिकारी यांना ही वस्तुस्थिती जगताप व नागरीकांनी निदर्शनास आणून दिली तसेच सावतानगर येथील महिलाही नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलनाला येत होत्या. परंतु, आम्ही त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न येण्यास सांगितले.

हंडीनिमगाव काय आणखी इतर गावांना पाणी द्या, आम्ही शहराचे नागरिक आहोत, आम्हाला पहिले पाणी द्या, सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महिला सह आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe