Ration Card : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना होय. सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. जर तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे.
कारण सरकार चुकीच्या पद्धतीने रेशन घेत असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करत आहे. कारण या योजनेचा काही पात्र नसलेले लोक लाभ घेत आहेत. सरकारच्या ही बाब लक्षात आल्याने आता सरकारने हे पाऊल उचलले आहे. कोणत्या लोकांवर कारवाई होणार जाणून घ्या.

द्या या गोष्टींकडे लक्ष
नंबर 1
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागणार आहे की ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहे त्यांना या मोफत रेशनचा लाभ घेता येणार नाही. तुमच्याकडे चारचाकी वाहने असतील तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. जर असे असूनही जर तुम्ही त्याचा लाभ घेत असाल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
नंबर 2
नियमांनुसार, जर तुमच्या उत्पन्नातून 100 चौरस मीटर जमीन, घर किंवा फ्लॅट घेतला असल्यास, तर तुम्हाला या मोफत रेशनचा लाभ घेता येणार नाही.
नंबर 3
जर तुम्ही खेड्यात राहत असाल तसेच तुमचे उत्पन्न 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला मोफत रेशनचा लाभ घेता येणार नाही. तसेच तुम्ही शहरात राहत असाल तर नियमांनुसार तुमचे उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला मोफत रेशनचा लाभ घेता येणार नाही.
कारवाई केली जाणार
जर तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घेतली नाही तसेच तुम्ही चुकीच्या पद्धतीने रेशन योजनेचा लाभ घेतला तर नियमानुसार तुमचे शिधापत्रिका रद्द करून तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा.