असे काही केले तर तुम्हाला व्हावे लागेल १४ दिवस होमकॉरन्टाइन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्‍णांच्या वाढत्‍या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्‍य सरकारने निर्बंध अधिक कठोर केले आहेत.

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आता १५ टक्‍केच कर्मचाऱ्यांची उपस्ि‍थती असणार आहे. लग्‍नसमारंभदेखील फक्‍त २५ वऱ्हाड्यांच्या उपस्ि‍थतीत दोन तासांतच उरकून घ्‍यावा लागणार आहे.

आंतरजिल्‍हा प्रवासावर बंदी नसली तरी केवळ अत्‍यावश्यक सेवा तसेच अत्‍यावश्यक कारणासाठीच हा प्रवास करण्यास परवानगी मिळणार आहे.

खासगी बसमध्ये ५० टक्‍के प्रवासी क्षमताच वापरता येणार आहे. लोकल, मेट्रो, मोनो सेवा फक्‍त्‍ा अत्‍यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच वापरता येणार आहेत.

या नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांना १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड बसणार आहे. २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्‍यापासून नवीन निर्बंध लागू होणार असून १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe