माहेराहून पैसे आणले नाहीस तर तुला जीवे ठार मारून टाकू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- एका ३६ वर्षीय महिलेचा माहेराहून घर खर्च, शेती कामासाठी पैसे आणण्यासाठी वारंवार मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातील हळगाव – जवळा रस्त्यावरील पुराणे वस्ती येथे घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, १३ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास विवाहिता जनावरांना चारा टाकत होती. त्यावेळी तुला जनावरांना चारा कोणी टाकायला सांगितला.

जनावरांचा चारा काय तू आई-वडिलांच्या घरून आणला काय? तू तुझ्या वडिलांकडून घरखर्चासाठी पैसे का आणत नाहीस? असे म्हणत सासूने विवाहितेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी सासऱ्यानेही मारहाण केली. पतीनेही शिवीगाळ करून माहेराहून पैसे आणले नाहीस तर तुला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पती संदीप भीमराज पुराणे, सासू गजराबाई भिवराज पुराणे, सासरा भिवराज अर्जुन पुराणे हे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe