एसबीआय मध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी वाचाच ! ‘हे’ काम केलं नाहीत तर 10000 रुपये दंड…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने असे म्हटले आहे की तुमच्या पॅन कार्डाशी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे.

याआधी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अनेकदा वाढवण्यात आली आहे. आता ही डेडलाइन 30 सप्टेंबर 2021 आहे. त्यापूर्वी तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास अनेक आर्थिक कामांचा खोळंबा होऊ शकतो.

30 सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकतं. अर्थात तुम्ही कोणत्याही कामाकरता त्या कार्डाचा वापर करू शकत नाही. आयकर, इन्कम टॅक्स रिटर्न, विविध बँकिंग सेवा, सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.

अशावेळी जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुमच्या महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. SBI ने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘आम्ही ग्राहकांना असा सल्ला देतो की त्यांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करावे,

जेणेकरुन कोणतही असुविधा होणार नाही आणि त्यांना अडथळा न येता बँकिंग सेवा अनुभवता येतील.’ तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास दंड भरावा लागण्याचीही शक्यता आहे. तसंच पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी

तुम्हाला 1000 रुपये लेट फीज देखील द्यावी लागेल. पॅन कार्ड निष्क्रिय झाले म्हणजे असे मानण्यात येईल की कायद्यानुसार पॅन कार्ड कोट करण्यात आले नाही. त्यामुळे आयकर कायदा 272B अंतर्गत 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!