PM Kisan Yojana: केंद्र सरकार (Central Government) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमधून दिलेले पैसे शेतकऱ्यांना खूप मदत करतात.
31 मे रोजी मोदी सरकारने दोन हजार रुपयांचा 11वा हप्ता शेतकऱ्यांना वर्ग केला.आता शेतकरी (Farmers) पुढच्या म्हणजेच 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवला जातो –
पीएम किसान योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत बाराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवता येतील.
लाभ घेण्यासाठी हे काम करा –
पीएम किसान योजनेसाठी सरकारने ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही ई-केवायसी न केल्यास, तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागू शकते. अशा परिस्थितीत करोडो शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घेतले पाहिजे. ई-केवायसीची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री किसान योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या उमेदवारांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांना लवकरात लवकर पैसे परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे न केल्यास सरकार त्यांच्यावर कारवाई (Action) ही करू शकते.
पीएम किसान योजनेचे हेल्पलाइन क्रमांक –
पंतप्रधान किसान योजना टोल फ्री क्रमांक:011-24300606,
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
पीएम किसान योजना ईमेल आयडी: ई-मेल आयडी: [email protected]