अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१७ मध्ये सुमारे ७२ कोटीहून जास्त रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचे समोर आले आहे.
जर २०२५ पर्यंत अशीच अवस्था राहिली तर हा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबर ही तारीख वर्ल्ड डायबेटीज डे म्हणून ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.
रक्तातील साखर अनियंत्रित राहिल्यास मधुमेह होतो. परंतु त्याची काही लक्षणे सुरवातीला दिसून येतात. त्याकडे जर वेळीच लक्ष दिले तर मोठ्या परमनंट होणारे आरोग्याचे नुकसान आपण टाळू शकतो.
१) मधुमेह झाल्यास मुत्राच्या रंगात बदल होतो. जर असे काही आढळून आल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाची चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
२) दैनंदिन कामे करताना नेहमीपेक्षा जर जास्त थकवा जाणवणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे वारंवार तहान लागत असेल तर हे लक्षणेही मधुमेहाचे असू शकते.
३) पायाची दुखापत किंवा जखमा भरून येण्यास अधिक वेळ लागणे हे तर मधुमेहाचे लक्षणं आहे. मात्र त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास वारंवार पायात गोळे येतात. पायात गोळे येण्याचे प्रमाण वाढल्यास अधिक वेळ न दवडता उपचार सुरू करा.
४) मधुमेह झाल्यास अतिप्रमाणात भूक लागते तर काहींची भूक अचानक मंदावते. तसेच वजनही कमी होते. वेळीच याकडे लासखा देऊन माधुयमची चाचणी करून घ्या.
५) रक्तात साखर वाढल्याने डोळे सुजतात. असे काही जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय –
कारलं :- कारल्यात केरोटिन नावाचे रसायन असते. याचा उपयोग नैसर्गिक स्टेरॉयड म्हणून केला जातो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. कारल्याच्या रसात पाणी घालून दिवसातून कमीत कमी तीन वेळा घेतल्यास नक्कीच फायदा होईल.
आवळा :- आवळ्यानेही मधुमेह नियंत्रित आणता येतो. आवळ्यामुळे शरीरातील व्हिटॉमिन सी ची कमतरता भरून काढली जाते. एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज प्या.
बडीशोप :- रोज जेवणानंतर बडीशोप खायची सवय अनेकांना असते. ही तशी चांगली सवय आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशोप खावी. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जांभूळ :- मधुमेह असणाऱ्या माणसाला गोड पदार्थ खाण्यापासून अडवलं जातं. अनेकांना फळांचा आस्वाद घेता येत नाही. परंतु मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ खाल्यानं त्यांचं शुगरचं प्रमाण कमी होतं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम